स्वातंत्र्यवीर सावरकर प्रबोधिनीच्या वतीने उद्या खा.अशोक नेते यांचा सत्कार

युवा संसदेच्या पुरस्काराबद्दल गौरव

गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांना पुण्यातील जाधवर ग्रुपच्या वतीने आयोजित सातव्या युवा संसदेत आदर्श खासदार म्हणून सन्मानित करण्यात आले. या उपलब्धीबद्दल गडचिरोलीतील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर प्रबोधिनीतर्फे ३ फेब्रुवारीला खा.नेते यांचा जाहीर सत्कार केला जाणार आहे.

चामोर्शी मार्गावरील साई मंदिरात शनिवारी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, वि.दा. सावरकर प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रमोद पिपरे, विश्व हिंदू परिषदेचे रामायण खटी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, भाजपच्या जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे आदी उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, डॉ.भारत खटी या पदाधिकाऱ्यांसह निळकंठ भांडेकर, सुधाकर पेटकर, दत्तू माकोडे, रवींद्र भांडेकर, प्रशांत आलमपटलावार, विनोद देवजवार आदींनी केले आहे.