राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंगळवारी गडचिरोलीत

'घड्याळ तेच, वेळ नवी' म्हणत साधणार संवाद

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर निघत आहेत. येत्या मंगळवार ७ नोव्हेंबरला ते गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यावेळी ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेऊन पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत.

त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.धर्मरावबाबा आत्राम हेसुद्धा त्यांच्यासोबत राहतील. सकाळी ११ ते दुपारी १ यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीला तटकरे यांच्यासह ना.धर्मरावबाबा मार्गदर्शन करतील, यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम आणि युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

‘घड्याळ तेच वेळ नवी’ असे म्हणत प्रदेशाध्यक्षांच्या या पहिल्यावहिल्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.