निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची (श.प.) निदर्शने

इंदिरा गांधी चौकात केली नारेबाजी

गडचिरोली : निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी गडचिरोलीत निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकात ही निदर्शने करण्यात आली. आमचा पक्ष शरद पवार, आमचे चिन्ह शरद पवार असे म्हणत यावेळी नारेबाजी करून निवडणूक आयोगाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा उपाध्यक्ष नईन शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, तालुकाध्यक्ष मोहन पाल, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, माजी नगरसेविका संध्या उईके, मीनल चिमूरकर, तसेच प्रमिला रामटेके, नीता बोबाटे, सुनील कत्रोजवार, सुनील चिमूरकर, मल्लया कालवा, नरेश कंदीकुरवार, रेखा कोराम, शाहरुख पठाण यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.