गडचिरोली : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने येत्या 11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पुणे येथील बालेवाडीत राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून हजारो युवक जाणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी कळविले.
या महामेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक युवक सहभागी व्हावेत, याकरिता राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर नियोजन करीत असल्याची माहिती रायुकाँचे कार्यालयीन सचिव गणेश बावणे यांनी दिली.
या महामेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि युवकांना सहभागी करण्यासाठी श्रीनिवास गोडशेलवार, रिंकू पापळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, तालुका अध्यक्ष कुणाल चिलगेलवार, फईम काझी, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, कपिल बागडे, शहर कार्याध्यक्ष हिमांशू खरवडे, सौरभ खोब्रागडे, संकेत जनगणवार, मंथन बुलबुले, रितिक डोंगरे, सागर दडमल, पराग दांडेकर, कार्तिक बुलबुले, आदिनाथ मंगर, कुणाल मडावी, अमोल जेटीवार, मोहित दुर्वा, संदेश कारेमोरे, रोहन इनकणे, प्रतीक टेकाम, नयन बानमकर आदी परिश्रम घेत आहेत.