भामरागड न.पं.सभापतीपदांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतर्फी विजय

सर्व विषय समित्या केल्या काबीज

भामरागड : नगर पंचायतमधील विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी (दि.21) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एकतर्फी विजय मिळवून सर्व समित्या काबीज केल्या.

त्यात बांधकाम सभापतीपदी तेजस्विनी मडावी, महिला बालकल्याण सभापतीपदी कविता येतमवार, तर आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून लक्ष्मी आत्राम यांची निवड करण्यात आली.

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात आ.धर्मरावबाबांचे खंदे कार्यकर्ते अरुण मुक्कावार यांनी सर्व तालुका पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ठरविलेल्या रणनितीनुसार काम केले. त्यामुळे एकतर्फी विजय खेचून आणण्यात त्यांना यश आले.

जिल्ह्यातील सर्व नगर पंचायतीच्या निवडणुकीवर धर्मरावबाबा स्वतः लक्ष ठेवून होते. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे जिल्ह्यातील 10 नगर पंचायतीपैकी 7 नगर पंचायतीच्या विषय समित्यांवर राष्ट्रवादीला विजय मिळवण्यात यश आले.

या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष वासेकर यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, कार्यकारी तालुका अध्यक्ष लालसू आत्राम, बाजार समितीचे संचालक सैनू आत्राम, नगरसेवक सतीश उईके, दिलीप उईके, गजानन उईके, साईनाथ कोडापे, राकेश महाका, सचिरेखा आत्राम, ललिता पुंगाटी, सुनीता गावडे, रमेश बोलमपल्ली, देवा विस्वास, जगदीश कोनकमुटीवार, अनुप मोडक, रोहित बोलमपल्ली या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.