सिरोंचा येथे आदिवासी महामंडळाच्या धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

सिरोंचा : तालुका मुख्यालयातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या धान खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सतीश गांजीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रिकुला कृष्णमूर्ति, संचालक रवी राल्लाबंडीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष एम.डी. शानू, संचालक बानय्या मंचार्ला, सत्यम चिलकामारी, मादेशी मदनय्या, रवी सुलतान, देवा येंगांदुला, सिदिक भाई आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना भाग्यश्री आत्राम यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामातील धान खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपले धान केंद्रावर विक्रीस आणून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.