भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाची मुंबईत प्रदेशस्तरीय समीक्षा बैठक

महामंत्री अशोक नेते यांची उपस्थिती

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जनजाती मोर्चाची प्रदेश समीक्षा बैठक शुक्रवारी (दि.27) मुंबईतील वसंत स्मृती भवनात पार पडली. भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत भाजपा एस.टी.मोर्चाची सदस्य नोंदणी व संघटनात्मक वाढीसाठी नवीन कार्यपद्धती, तसेच धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. संघटनेच्या विस्तारासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. बैठकीच्या सुरूवातीला मा.खा.अशोक नेते यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

बैठकीला प्रामुख्याने राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय प्रभारी व्ही.सतीश, आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके, एसटी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ.उत्तम इंगळे, संघटक किशोर काळकर, मध्यप्रदेश युवा आयोगाचे अध्यक्ष डॉ.निशांत खरे, खासदार हेमंत सावरा, आ.हरिश्चंद्र भोये, आ.संजय पुराम, आ.राजू तोडसाम, आ.राजेश पडवी, आ.केवळराम काळे, प्रदेश प्रवक्ता दिनेशजी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, मीडिया प्रमुख अक्षय उईके यांच्यासह मोठ्या संख्येने अनु.जनजाती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.