आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित २१ व २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात

गडचिरोलीसह कुरखेडा, अहेरीत कार्यक्रम

गडचिरोली : आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित २१ व २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यात ते तीन ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

बुधवार, दि.21 रोजी रात्री 8 वाजता कुरखेडा येथे त्यांचे आगमन होणार आहे. तेथील एका स्थानिक कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. तेथून रात्री 10.20 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे पोहोचून मुक्काम करतील.

गुरुवार, दि.22 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता गडचिरोली येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थित राहून दुपारी 1 वाजता अहेरीकडे प्रयाण करतील. दुपारी 4 वाजता अहेरी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थित राहून सायंकाळी अहेरी येथुन चंद्रपूरकडे प्रयाण करतील.