बंजारा समाजाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात रंगल्या महिलांच्या विविध स्पर्धा

उत्साहाने सहभागी होऊन दाखविली चुणूक

गडचिरोली : येथील सेमाना देवस्थानात बंजारा समाजाच्या वतीने हळदी-कुंकू आणि स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील बंजारा समाजातील महिला भगिनींनी उत्साहाने सहभागी होवुन विविध स्पर्धा आणि खेळांमध्ये सहभागी होऊन आपल्यातील सुप्त गुणांचे प्रदर्शन घडविले.

या कार्यक्रमात हळदीकुंकवासह वेगवेगळे खेळ घेण्यात आले. त्यातील संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक प्रिती पवार व द्वितीय क्रमांक मुक्ता जाधव यांनी पटकाविला. चणा-बांगडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक छाया जाधव तर द्वितीय क्रमांक प्रिती पवार यांनी पटकावला. बलुन कपल स्पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली राठोड व प्रमिला चव्हाण यांनी व द्वितीय क्रमांक सोनाली व पल्लवी राठोड यांनी पटकावला.

महिलांचे स्वागत समाजाच्या महिला अध्यक्ष गिता चव्हाण व शितल राठोड यांनी केले. प्रिती पवार यांनी सुत्र संचालनाची जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमासाठी शशिकला राठोड, कुसूम राठोड, माधुरी आडे, मुक्ता जाधव, शोभा भुके, कविता जाधव, वैशाली राठोड, राणी राठोड, छाया राठोड, वैशाली संजय राठोड, सोनाली राठोड, दिपिका चव्हाण, प्रमिला चव्हाण, अनु पवार, पल्लवी राठोड, रुपाली राठोड, अंबिका राठोड, माधुरी राठोड, सकरी जाधव व द्रोपदाबाई राठोड यांनी सहकार्य केले.