गडचिरोली : गावकऱ्यांचा विरोध असताना प्रस्तावित विमानतळाची जागा निश्चित करणारा 12 मे रोजीचा जीआर रद्द करण्यासाठी संबंधित गावांमधील नागरिकांनी असहकार्याची भूमिका घेत जनगणनेच्या कामाला विरोध केला आहे. राखी, गुरवळा आणि हिरापूर येथील नागरिकांनी संबंधित यंत्रणेला परत पाठवत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर तहसीलदार सागर कांबळे यांनीही गावात येऊन नागरिकांना समजावले. पण गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.
दि.22 ला तहसीलदार सागर कांबळे यांनी राखी, गुरवळा येथील ग्रामस्थांशी चर्चा करून जनगणनेच्या कामाला सहकार्य करण्यास सांगितले. पण जोपर्यंत 12 मे 2026 चा जीआर रद्द करणार नाही, तोपर्यंत आम्ही जनगणना किंवा कोणत्याही सरकारी कामाला सहकार्य करणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
विमानतळाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी गावकऱ्यांना दिले आहे.
































