गडचिरोली : शहरातील कॅम्प एरिया येथील प्रसिद्ध दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात आयोजित जागरण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. (खाली वाचा)

याप्रसंगी दुर्गामाता मंदिराचे अध्यक्ष तथा नगरसेवक रमेश चौधरी यांच्या वतीने डॉ.अशोक नेते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.नेते यांनी दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक होत समस्त नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद नांदो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, तसेच प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी प्रार्थना केली.
नवरात्रोत्सव हा शक्ती, श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आनंदराव पारधी, सुरेश ताकसांडे, रजनिकांत मोटघरे, प्रवीण देशमुख, दिलिप गडपल्लीवार, नंदु वाईलकर, गुलाब कोलते, दत्तू खरवडे, अमित बंदे, दयाकर चौधरी, विवेक दुधमोचन, नरेश खोबे, कान्हूजी लोहबरे, गणेश तारक, त्रिमुर्ती डोमळे यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
































