अहेरीतील शिवाजीनगर प्रभागात नवीन रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते शुभारंभ

अहेरी : शहरातील शिवाजीनगर, प्रभाग क्रमांक ६ मधील १ कोटी ८० लक्ष रुपयांच्या सिमेंट रोड, नालीसह विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, नालीची समस्या होती. नगरसेविका दीपाली मुकेश नामेवार यांनी पाठपुरावा करून ही समस्या सोडविली.

या कार्यक्रमाला युवानेते अवधेशराव बाबा, चितेश्वरराव बाबा, भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच शिवाजीनगर प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.