माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचा देवनगरच्या बिश्वास कुटुंबाला आधार

उपचारासाठी केली १० हजारांची आर्थिक मदत

ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेताना अम्ब्रिशराव आत्राम.

मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील रहिवासी असलेले दिलीप बिश्वास हे काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होते. मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. म्हणून त्यांना चंद्रपूर येथील मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचे होते. पण आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने कुटुंबासमोर प्रश्न निर्माण झाला. ही बाब मूलचेरा तालुका दौऱ्यावर आलेल्या माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथे जाऊन दिलीप बिश्वास यांच्या कुटूंबाची भेट घेतली. आस्थेने त्यांची विचारपूस करून त्यांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला. दिलीप यांच्या उपचारासाठी कुटुंबाला १० हजारांची मदत केली.

बिश्वास यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही अम्ब्रिशराव यांनी दिले. विशेष म्हणजे अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव हे अनेकदा आपल्या दानशूर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील पीडित नागरिकांच्या अडीअडचणीत, संकटात सर्वतोपरी मदत करीत असतात. बिश्वास यांच्या मदतीने पुन्हा त्यांनी या दानशूरतेचा परिचय दिला.

यावेळी विवेकानंदपूरचे उपसरपंच तपन मल्लिक, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, जिल्हा सचिव बादलशाह, युवा मोर्चाचे अध्यक्ष संजीव सरकार, नगरसेवक दिलीप आत्राम, किशोर मल्लिक, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, गुलशन मलेमपल्ली, पवन आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.