गडचिरोली : जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील मेटावाडा या अतिदुर्गम गावातील युवतीला उपचारासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतील लाहेरी येथे आणण्यात आले. मात्र चांगले रस्ते आणि दळणवळणाच्या साधनांच्या अभावामुळे त्या युवतीला आणण्यासाठी खाटेची कावड करावी लागली. यादृष्ट्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
तब्बल १८ किलोमीटर पायी चालत रुग्ण युवतीचे नातेवाईक भामरागड तालुक्यातल्या लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. विशेष म्हणजे त्या दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे वैद्यकीय मदतीसाठी नागरिकांना संपर्क करणेही कठीण जाते. दरम्यान त्या युवतीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.