अखेर त्या अतिक्रमित जमिनीच्या मोजणीला सुरुवात, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

भाग्यश्री आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश

कर्मचाऱ्यांसोबत स्वत: बांधावर जाऊन पाहणी करताना भाग्यश्री आत्राम.

अहेरी : तालुक्यातील पेरमिली परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमित जमिनीला मालकी हक्क मिळाला नसल्याने माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेतला. अखेर अतिक्रमित शेतजमीन मोजणीला सुरुवात झाली आहे.

माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी स्वतः संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोजमाप कामकाजाची पाहणी केली. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना या कामात मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे शेतजमिनी मोजणीच्या कामाला अधिक गती मिळाली आहे.

अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील शेतकरी २००५ पूर्वीपासून वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मालकी हक्क मिळाला नसल्याने त्यांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना अपयश आल्याने येथील शेतकऱ्यांनी माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शेतजमिनीचे मोजमाप करण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार या परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमित शेतजमिनीची मोजणी करायला सुरूवात करण्यात आली. वनहक्क समिती, महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, तलाठी पुजा मडावी, वनरक्षक देव लेकामी, कोतवाल वासुदेव कोडापे, वारलू आत्राम, वन कर्मचारी संतोष मेश्राम, वनहक्क समितीचे अध्यक्ष देवराव मडावी, वनहक्क समितीचे सचिव शंकर कुंभारे, तसेच सत्यनारायण येगोलोपवार, देवाजी सडमेक, बंडू दहागावकर, महेश चांदेकर, नारायण मडावी, संतोष मडावी, तिरुपती कोसरे, रुपेश हजारे, सुरेश हजारे, कारू दहागावकर, माधव दहागावकर, रुसी चांदेकर, प्रणय दहागावकर, रामचंद्र चांदेकर, गोपाळ पोटदुखे, सदु सडमेक, गणपत आतकुलवार, बापू औतकर, ललिता चांदेकर, कोंडू दहागावकर, विश्वनाथ हजारे, विलास दहागावकर, लक्ष्मण मडावी, राजू आत्राम इत्यादी उपस्थित होते.