अस्मानी संकट कोसळलेल्या कुटुंबाला अजय कंकडालवार यांचा आर्थिक दिलासा

अहेरी : तालुक्यातील महागाव बुज येथील शेतकरी लक्ष्मण नानाजी रामटेके यांचा शेतात काम करताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. या परिस्थितीत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करत दिलासा दिला.

शेतीची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी शेतकरी लक्ष्मण रामटेके बांधावर गेले होते. त्याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मूत्यू झाला. या घटनेची माहिती गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांकडून अजय कंकडालवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याच दिवशी महागांव बुज येथील रामटेके यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांना आधार दिला. त्यांना मदतीची गरज असल्याचे लक्षात येताच पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली. तसेच शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य लवकरात लवकर देण्याची विनंती तहसीलदारांना केली.

यावेळी नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्रामपंचायत सदस्य राजेश दुर्गे, प्रमोद रामटेके, संजय अलोने, चंद्राजी रामटेके, समय्या येर्रावार, स्वामी आत्राम, वंदना दुर्गे, सोनू गर्गम, विजय अलोने, मारूती कारमे, भीमा चौधरी, पुरुषोत्तम गर्गम, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.