गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाची युवक आघाडी असलेल्या पुरोगामी युवक संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्हाध्यक्षपदी अक्षय कोसनकर यांची, तर गडचिरोली तालुक्यातील काटली ग्रामपंचायतीचे सदस्य देवेंद्र भोयर यांची यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे यांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी जाहीर केली. सगणापूर (चामोर्शी) येथील राजू केळझरकर, पोर्ला (गडचिरोली) येथील यशवंत मुरकुटे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर वडसा तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतचे सदस्य रजनीकांत गुरनूले, धन्नूर (मुलचेरा) येथील चिरंजीव पेंदाम यांची जिल्हा सहचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी येथील नितीन मेश्राम यांची सोशल मीडिया जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगेश येनप्रेड्डीवार फराडा (चामोर्शी), विनोद उराडे गडचिरोली, महेंद्र जराते पुलखल (गडचिरोली), विठ्ठल पिपरे बोदली (गडचिरोली), बाबुलाल रामटेके कुरखेडा, आविष्कार गड्डमवार एट्टापल्ली, सुरज ठाकरे आरमोरी, रवि चेर्लावार आलापल्ली (अहेरी), प्रल्हाद पोरेटी पांढरसडा (धानोरा), महेश आभारे मारोडा (चामोर्शी), अंकुश मारबते गडचिरोली, हिराचंद कोटगले नगरी (गडचिरोली), नरेश कोसरे धानोरा, भूषण चिंचोलकर गडचिरोली यांची जिल्हा युवक आघाडी कार्यकारिणी सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री वेळदा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या नियुक्तीचे स्वागत केले.