– तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी भावाने व्यापाऱ्यांना विकावा लागणार धान

बोनसपासूनही राहावे लागणार वंचित!

गडचिरोली : धानाचे कोठार म्हटल्या जाणाऱ्या गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांत यावर्षी धानाची भरडाई अद्याप सुरू झालेली नाही. परिणामी सर्व गोडाऊन पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणची धान खरेदी बंद करण्यात आली आहे. अशा स्थितीत पैशाची गरज असणारे शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत.