जड वाहतूक आणि खराब रस्त्यांच्या मुद्द्यावर मंगळवारी बोरीत चक्काजाम

अहेरी : राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, त्यात जड वाहतुकीमुळे फसणारी वाहने, या ट्राफिक जाममुळे होणारा त्रास याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.११) आदिवासी विद्यार्थी संघ आणि अजयभाऊ मित्र परिवाराच्या वतीने बोरी येथे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे.

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आणि आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या आंदोलनात सकाळी ११ वाजता सहभागी होण्याचे आवाहन अजयभाऊ मित्र परिवाराने केले आहे.