राहुल गांधी यांच्यावरील दबावतंत्राच्या विरोधात गडचिरोलीत काँग्रेसची निदर्शने

जिल्हा प्रभारी डॅा.नामदेव किरसान यांचे नेतृत्व

गडचिरोली : काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य गोरगरीब जनतेपासून सर्व घटकांच्या समस्यांना घेऊन, तसेच अदानी घोटाळ्याला घेऊन नेहमी आवाज उचलत आहेत. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्याकरिता गुजरात येथे सरकारच्या दबावाखाली मानहाणीचे खोटे खटले चालवले जात आहे, असा आरोप करत भाजपच्या दडपशाही धोरणाविरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि जिल्हा प्रभारी डॅा.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, रोजगार सेलचे अध्यक्ष दामदेव मंडलवार, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, माजी नगरसेवक गुलाब मडावी, महादेव भोयर, हरबाजी मोरे, रोजगार सेलच्या कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, प्रतीक बारसिंगे, भय्याजी मुद्दमवार, राकेश रत्नावार, सुरेश भांडेकर, सुभाष धाईत, पुरुषोत्तम सिडाम, बंडोपंत चिटमलवार, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढिवरू मेश्राम, ज्ञानेश्वर पोरटे, योगेंद्र झंजाळ, आय.बी. शेख, दीपक रामने, अरुण पुण्यप्रेड्डीवार, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, प्रफुल आंबोरकर, वसंत सातपुते, निकेश कामीडवार, जावेद खान, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, कल्पना नंदेश्वर, मंगला कोवे, वंदना ढोक तथा मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.