व्याघ्रबळी ठरलेल्या महिलेच्या कुटुबियांची खा.अशोक नेते यांनी घेतली भेट

शासकीय मदत देण्याची केली सूचना

गडचिरोली : गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या वाकडी येथे बुधवारी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मंगला विठ्ठल ‌बोडे या महिलेच्या कुटुंबियांची खासदार अशोक नेते यांनी भेट घेतली. वाकडी या गावातील नदीघाटावर जाऊन खा.नेते यांनी त्यांची भेट घेऊन कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांच्या दुःखात सहभागी होऊन खा.नेते यांच्या हस्ते कुटुंबियांना आर्थिक मदतसुद्धा देण्यात आली. यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शासनस्तरावरून लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश देत देऊन वाघाच्या हल्ल्यात कोणाचा बळी जाणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी भाजपचे तालुका महामंत्री बंडू झाडे, सचिव रवींद्र भोयर, वाकडीच्या सरपंच सरिता चौधरी, उपवनसंरक्षक मिलीशदत्त शर्मा, सहायक वनसंरक्षक धिरज ठेमरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन हेमके, तसेच वनविभागाचे कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.