सिरोंचातील इदगाहच्या संरक्षण भिंतीसाठी विशेष अनुदान योजनेतून १५ लाख

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

सिरोंचा : येथील मुस्लिम समाजाच्या इदगाहला संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी संरक्षण भिंत बांधकामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत १५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

तालुक्यात मुस्लिम समाज बांधवांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक १० मध्ये असलेल्या इदगाहला संरक्षण भिंत नसल्याने अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम व्हावे अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली होती.

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना समाज बांधवांना घेऊन त्यांनी भूमिपूजन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, रवी रालाबंडीवार, एम डी शानू, गणेश बोधनवार, रंजित गागापुरपवार, एम.डी. इरफान, अॅड.फिरोज खान, अमजद खान, रियाज खान, इम्रान अली, माजिद अली, सलमान अली, मुजफ्फर खान तसेच मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.