कत्तलखान्यात जाणाऱ्या २२ गोवंशीय जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान

दोन ट्रकमधून सुरू होती वाहतूक

गडचिरोली : दोन मालवाहू वाहनांमधून कत्तलखान्याकडे जात असलेल्या २२ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. कुरखेडा तालुक्यातील आंधळी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्या वाहनांना थांबण्याचा इशारा केल्यानंतर चालकांनी वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी २२ गोवंशीय जनावरांची सुटका करून दोन्ही वाहने जप्त केली. त्या वाहनांची किंमत २० लाख तर जनावरांची किंमत दिड लाख रुपये असल्याचे पोलिसांनी कळविले.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार, कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात हवालदार बाबुराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यलगडे व मनोज राऊत यांनी आंधळी गावाजवळ ही कारवाई केली.