बदललेले स्मृति उद्यान तुम्ही पाहिले का?

गडचिरोली शहरात कॉम्प्लेक्स या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या परिसरात ‘स्मृति उद्यान’ नावाचा बगीचा अनेक वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. पण गेल्या काही वर्षात या उद्यानाची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली होती. आता या बगिचाचे नुतनीकरण करून विविध प्रकाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे उद्यान पुन्हा एकदा गडचिरोलीकरांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे.