प्रभारी तहसीलदारांनी जप्त केली कठाणी नदीपात्रातून काढलेली रेती

कोणाचा हा कारनामा? आरोपी अज्ञात

गडचिरोली : तालुक्यातील मौजा लांझेडा भागातील कठाणी नदीपात्रालगत अज्ञात लोकांनी अनधिकृतपणे नदीतून काढून ठेवलेला रेतीचा साठा गडचिरोलीचे प्रभारी तहसीलदार हेमंत मोहरे यांनी जप्त केला. मात्र ही रेती काढण्याचे काम कोणी केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. १७ ते १८ ब्रास असलेली ही रेती जप्त करून तहसील कार्यालयात आणली असून ती घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहे.

कठाणी नदीपात्रात नदीतून अनधिकृतपणे काढलेल्या रेतीचा साठा करून ठेवला असल्याची माहिती प्र.तहसीलदार मोहरे यांना मिळाली होती. त्यांनी तलाठी अजय तुनकलवार आणि राकेश कुथे यांच्यासह तिथे जाऊन तपासणी केली. त्या रेतीसाठ्याचा पंचनामा करून तो जप्त करण्यात आला.