भर रस्त्यावर तलवारीने केक काप­णे आरमोरीच्या तरुणाला पडले महाग

पोलिसांनी काय केली कारवाई, वाचा

आरमोरी : अलिकडे स्टंटबाजी करताना आपण कायदा हातात घेतो का, याचेही भान बेभान झालेल्या युवकांना नसते. असाच एक प्रकार आरमोरी येथे घडला. यावेळी आपल्या वाढदिवसाचा केक भर रस्त्यावर चक्क तलावीसारख्या शस्राने कापताना आढळलेल्या युवकासह त्याच्या मित्रांनी पोलिसांनी कोठडीही हवा खाऊ घातली.

त्याचे असे झाले की, आरमोरी पोलिस नेहमीप्रमाणे शहरात रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रामाळाकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री १२.३० वाजताच्या सुमारास काही तरुण आरडाओरड करून गोंधळ घालत असल्याचे दिसले. जवळ जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता रस्त्यात दुचाकीच्या सीटवर केक ठेवुन तलवारीने केक कापत असल्याचे दिसून आले.

सार्वजनिक ठिकाणी तलवारसारखे शस्र बाळगणे गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी लोकेश विनोद बोटकावार (२१ वर्ष), लोकमित्र खुशाल ठाकरे (२५ वर्ष), बादल राजेंद्र भोयर (२३ वर्ष), पवन मनोहर ठाकरे (२५ वर्ष) यांना ताब्यात घेतले. तसेच राहुल मनोहर नागापुरे (२८ वर्ष) याचा शोध सुरू आहे. या सर्वांविरूद्ध भारतीय हत्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत एक धारदार तलवार, एक जुनी अॅक्टिवा 6 जी दुचाकी वाहन, एक बाईक असा एकुण अंदाजे 96,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम.रमेश व उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीश्रक संदीप मंडलीक व पोलिस अंमलदारांनी पार पाडली.