आलापल्लीतील क्रीडा संकुलात रंगली पुरूष-महिलांची बॅडमिंटन स्पर्धा

क्रीडा क्षेत्रातून करिअर घडवा- अम्ब्रिशराव आत्राम

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील क्रीडा संकुलात युनिक बॅडमिंटन क्रीडा प्रबोधिनी तथा जिल्हा क्रीडा भारती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने बॅडमिटन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, पुरुष-महिला दुहेरी आणि एकेरी कनिष्ठ मुले अशा स्पर्धा झाल्या. प्रत्येक गटात प्रथम आणि द्वितीय पुरस्कार माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि अवधेशराव बाबा आत्राम यांच्याकडून देण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धकांना संबोधित करताना ते म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. परिश्रम घ्यावे लागते. आज प्रत्येक क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी स्पर्धा आहे. आपण क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून करिअर घडवावे, आपली प्रगती करावी आणि आपले भविष्य बनवावे, असा सल्ला त्यांनी यावेळी युवक-युवतींना दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम.खोब्रागडे, प्रमुख पाहुणे म्हणून अवधेशराव बाबा, डॉ.साई चिमरालवार, प्रवीण बुरान, सुभाष शेंडे, संतोष जुनघरे, शालू केशनवार, पूजा आत्राम, काजल मडावी, प्रियांका देवकर, कन्या मिरलवार हे उपस्थित होते.