बहिणी बनून आलेल्या आशा वर्कर्सनी घातली आ.गजबे यांना भाऊबीजेची ओवाळणी

सदैव पाठिशी राहण्याची दिली ग्वाही

देसाईगंज : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे भाऊबीज. बहिणीने भावाला ओवाळायचा, त्याचे औक्षण करण्याचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्यातील आशा वर्कर्स महिलांनी आ.कृष्णा गजबे यांना ओवाळणी घातली.

तालुक्यातील आशा वर्कर्सच्या वतीने आमदार गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना ओवाळून औक्षण केले. राज्य सरकारने नुकतीच आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ केली. भावाकडून या बहिणींना मिळालेली ही भाऊबिजेची भेटच असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आभार मानले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी आपणस सदैव आपल्या आशा भगिनींच्या पाठिशी असून त्यांच्या सुख-दुःखात सोबत राहिल, अशी ग्वाही यावेळी दिली.