राजनगरी अहेरीत साकारणार नवीन बौद्ध विहार

अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून बांधकामासाठी पाच लाखांची मदत

बौद्ध समाजबांधव आणि महिलांकडे देणगीचा धनादेश सोपविताना माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम.

गडचिरोली : राजनगरी अहेरी येथे असलेले जुने बुद्ध विहार जिर्ण झाल्याने ते पाडून नवीन मोठे बौद्ध विहार बांधण्याचा मनोदय बौद्ध समाज बांधवांनी व्यक्त केला. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज भासत होती. ही बाब अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना समजल्यानंतर त्यांनी बौद्ध समाज बांधवांशी संवाद साधून त्यांची अडचण जाणून घेतली. त्यानंतर प्रस्तावित बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली.

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना गौतम बौद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा या बौद्ध विहारातून मिळावी, युवा पिढीमध्ये संस्कार वाढावे आणि आदर्श व्यक्ती घडण्याच्या उद्देशाने बौद्ध विहार एक केंद्रबिंदू बनेल, असे मत यावेळी अम्ब्रिशराव यांनी व्यक्त केले.आपण अशा चांगल्या कामासाठी सदैव आपल्यासोबत आहोत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बौद्ध समाज ज्ञान प्रसारक युवक मंडळ अहेरीचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सहसचिव प्रशांत भिमटे, संजय ओंडरे, रमेश अलोने, मारोती ओंडरे, तिरुपती चालूरकर, रोहीत ओंडरे, परशुराम दहागांवकर तसेच महिला सदस्य कमला ओंडरे, शोभा भीमटे, कमल अलोने, प्रफुल्ला ढोलगे, लता ओंडरे, सरिता अलोने, रसिका दहागांवकर, माया दुर्गे, माधुरी माउलीकर, भारती ओंडरे, दिव्या अलोने, शकुन अलोने, उमा चल्लूरकर, गंगासागर कांबडे, निर्मला दुर्गे, सगुणा दुर्गे आदी समाजबांधव, गावकरी उपस्थित होते.