बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त जोगीसाखऱ्यात दोन दिवस कार्यक्रम

रक्तदान शिबिरासोबत सांस्कृतिक मेजवानी

आरमोरी : तालुक्यातील जोगीसाखरा येथे येत्या १५ व १६ नोव्हेंबर रोजी क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त दोन दिवसीय जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात आदिवासी गोंड समाजाच्या वतीने दि.१५ ला सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर, तर रात्री आदिवासी नृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दि.१६ ला गोंडी रेला नृत्यासह रॅली काढली जाणार आहे. तसेच बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आणि विवाह सोहळा आयोजित केला आहे. रात्रीला विदर्भातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार, गायक विजयकुमार शेंडे यांचा पंचरंगी कार्यक्रम सादर होणार आहे. तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जयंती उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी गोंड समाज जोगीसाखरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.