गडचिरोली : समस्त बंजारा समाजासह अनेकांचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर रोड, बस थांब्याजवळील चव्हाण हॉस्पिटल येथे अँजल कन्स्ट्रक्शन व चव्हाण हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मा.खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पणाने झाली. उपस्थित भाविकांनीही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
या जयंती कार्यक्रमाला भाजपच्या कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, नितिन बाबुसिंग राठोड, उमेश राठोड, डॉ.निखिल चव्हाण, गीता चव्हाण, प्रीती पवार, मनोज जाधव, अजय जाधव, सोनाली राठोड, ज्योती राठोड, शीतल राठोड, वैशाली राठोड, दीपिका चव्हाण, डॉ.श्रद्धा चव्हाण, डॉ.यश्र्या चव्हाण, विशाल चव्हाण यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
समाजातील एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी, तसेच संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.