गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला परिसरात मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. रानटी हत्ती व वाघांमुळे शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती मिळाल्यानंतर खासदार डॉ.नामदेव किरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.
खा.डॉ.किरसान यांनी भ्रमणध्वनीवरून मुख्य वन संरक्षक रमेशकुमार यांच्याशी चर्चा करून तातडीने हत्तीचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. सोबतच पोर्ला क्षेत्रातील जनतेला जळाऊ लाकडांची व्यवस्था पोर्ला प्रादेशिक कार्यालय येथे उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भूपेश कोलते, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंत पाटील राऊत, सरपंच निवृत्ती फराडे, मनोहर नवघडे, देविदास भोयर, अशोक बोहरे, प्यारेमोहम्मद शेख, विजय येवले, उमेश खरवडे, विनोद आजवले, उमेश आछाडे, जितू पोटे, देविदास चापले, बंडू हजारे, उज्वला खरवडे, देवराव कोलते, डबाजी झोडगे, बंडू बावणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.