रक्तदान करून दुसऱ्यांना जीवनदान द्या, स्वत:चे हृदयही निरोगी ठेवा- आ.गजबे

वडधा येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

आरमोरी : रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते, शिवाय हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला नुकसान होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदानातून दुसऱ्यांना जीवनदान देण्यासोबत स्वत:चे आरोग्यही चांगले ठेवा, असे मार्गदर्शन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. आरमोरी तालुक्यातील वडधा येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

रंगतरंग बाल दुर्गा उत्सव मंडळव्दारा या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वाजतगाजत आ.गजबे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, आरमोरीचे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, कुरखेडाचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश चापले, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दुर्वेजी भोयर, प्रशांत मेश्राम, डॅा.जितेश शरकुरे, विवेक खेवले, वडधाच्या सरपंच प्रिया गेडाम, उपसरपंच विलास सेलोटे, सदस्य भूपेश कोलते, तसेच शक्ती केंद्र प्रमुख खेमराज राउत व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.