सेवा पंधरवड्यानिमित्त इंदिरानगरात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

खा.अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष गडचिरोली शहर शक्ती केंद्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा राबविला जात आहे. यानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर तथा नमो प्रदर्शनी, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड नोंदणी वाटपाचा कार्यक्रम लांझेडा, इंदिरानगर येथे आयोजित केला होता.

बाल गणेश मंडळाच्या सार्वजनिक उत्सवस्थळी आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी दीप प्रज्वलन करुन केले. यावेळी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन खासदार नेते यांनी स्वतः शुगर, बीपी तपासून आरोग्य तपासणीचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनीसुद्धा बीपी, शुगर तपासणी केली.

कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते रमेश भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री विनोद देओजवार, शहर महामंत्री हर्षल गेडाम, श्याम वाढई, नरेश हजारे, कान्होजी लोहंबरे, तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इंदिरानगरातील बाल गणेश मंडळाचे सदस्यगण उपस्थित होते.