गडचिरोलीत ‘दिव्यांगांच्या दारी’ उपक्रम, बच्चू कडूंच्या हस्ते देणार लाभ

उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

गडचिरोली : जिल्हा प्रशासन आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने बुधवारी (दि.२७) गडचिरोलीत दिव्यांगांच्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ व वितरण दिव्यांगांना केला जाणार आहे. संस्कृती लॉनमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक (मंत्रीपदाचा दर्जा)ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांच्यासह जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच विविध विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावले जाणार आहेत. दिव्यांगांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी, तसेच ओळखपत्र आवश्यक असते. दिव्यांगांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.