अहेरीत बौद्ध जयंतीचा उत्साह, सामुहिक त्रिशरण व पंचशिल ग्रहण, खिर दान

रुग्णालयात वाटली फळे आणि बिस्कीट

अहेरी : येथील बौद्ध विहाराच्या पटांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने गुरूवार, दि.23 मे रोजी वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रामचंद्र ढोलगे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरित्या त्रिशरण-पंचशिल ग्रहण करण्यात आले.

तसेच महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वैशाख पौर्णिमेनिमित्त तिरुपती चालुरकर यांच्या वतीने खिर दान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राहुल गर्गम यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णालयात फळे व बिस्किटांचे वाटप

बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते नभित ढोलगे यांच्या वतीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सर्वप्रथम अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.के.धुर्वा आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांच्या वतीने रुग्णांना फळे व बिस्कीट वाटण्यात आले. यावेळी नभित ढोलगे, राहुल गर्गम, आशिष अलोणे, कपिल ढोलगे, प्रणय अलोणे, महेश मोहुर्ले, नागेश मडावी, राहुल दुर्गे, यश चांदेकर आदी युवक उपस्थित होते.