गडचिरोली : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात मंगळवारी (दि.९) गडचिरोली येथे होत आहे. यानिमित्त आयोजित महाशिबिरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत येणार आहेत. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातील २५ हजार महिलांना आणण्याचे नियोजन केले असून त्यासाठी एमआयडीसीच्या मैदानावर भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे जुलै महिन्यात याच मैदानावर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. आता पुन्हा त्याच मैदानावर हे त्रिमुर्ती एकत्र येत आहेत. बाहेरगावच्या महिलांना या कार्यक्रमाला आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्या मोठ्या प्रमाणावर बुक करण्यात आल्या आहेत.
या महाशिबिराची सुरूवात सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. यावेळी विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या विकासकामांचे होणार लोकार्पण व भूमीपूजन
100 मोबाईल टॉवर, प्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती), मानव विकास मिशनअंतर्गत 8 एकल गोडाऊन (आंबेझरी, कांदाळी, राजगोपालपूर, डार्ली, नरोटीचक, धोडराज, होडरी व गोंगवाडा), एकल सेंटर (मौजा मेंढा ता.धानोरा, एकल सेंटर कुरुड ता.देसाईगंज), आदिवासी विभागाच्या शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद प्रशासकीय इमारत, चामोर्शी तालुका क्रीडांगण, धानोरा तालुका क्रीडांगण, चामोर्शी नगर पंचायत प्रशासकीय भवन, वघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता.आरमोरी), चोप-तमाशीटोला ते वडसा मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (ता.वडसा), सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा या मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (ता.धानोरा), मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता.वडसा), मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे (ता.वडसा), वडसा-नैनपूर-कोकडी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता.वडसा), कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता.आरमोरी), मौशीखांब-वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता.आरमोरी), मौशीखांब-वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता.आरमोरी), वडधा-सायगाव-शिवणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता.आरमोरी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-C शिवराजपूर-उसेगाव- मोहटोला-किन्हाळाची दजोन्नती करणे (ता.वडसा), MRL-01- आमगाव-गांधीनगर रस्ता दजोन्नोती करणे (ता.वडसा), दवंडी-रांगी रस्ता दजोन्नोती करणे (ता.आरमोरी), कुलकुली-अंगारा रस्ता दजोन्नोती करणे (ता.आरमोरी), भांसी-माजिटोला रस्ता दजोन्नती करणे (ता.आरमोरी), डोंगरमेन्ढा रस्ता दजोन्नती करणे (ता.आरमोरी), मार्कण्डा देव पुनर्निर्माण कार्य, मार्कण्डा देवस्थान नुतनीकरण कार्य (राज्य शासन), चपराळा देवस्थान (ता.चामोर्शी) पर्यटन विकास, अरतोंडी पर्यटन विकास, कमलापूर पर्यटनस्थळ विकास (ता.अहेरी) रामदेगी (ता.चिमूर) पर्यटनस्थळ विकास, सोमनूर पर्यटनस्थळ ता.(सिरोंचा), कचारगड तिर्थक्षेत्र विकास (ता.सालेकसा, जि.गोंदिया), गडचिरोली शहरातील तलाव सौदर्यीकरण, नगर परिषद प्रशासकीय इमारत लोकार्पण आदी कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम स्थळावरूनच केले जाणार आहे.