क्रीडा संकुलाच्या कामासाठी निधी नसल्याने काँग्रेसने केले ‘भीक मांगो’ आंदोलन

खेळाडू युवतींचाही सहभाग, पहा व्हिडीओ

गडचिरोली : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवर कोट्यवधी रुपये खर्चुन उभारल्या जाणार असलेल्या विविध खेळांच्या सुविधांसाठी राज्य शासनाकडून निधीच मिळत नसल्याने हे काम थंडबस्त्यात पडले आहे. यामुळे खेळाडूंसह पोलिस, वनभरतीची तयारी करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी संध्याकाळी जिल्हा क्रीडा संकुलावर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, लोकसभा प्रभारी डॅा.नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात केलेल्या या अनोख्या आंदोलनात शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, डॅा.नितीन कोडवते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.