काँग्रेस कमिटीतर्फे शाहू महाराजांना आदरांजली

गडचिरोली : अस्पृश्यता, जातीभेद निर्मूलनासाठी अथक प्रयत्न करणारे, बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे, सामाजिक न्याय व पुरोगामी विचारांना चालना देणारे, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भरत येरमे, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, ओबीसी विभागाचे महासचिव पांडुरंग घोटेकर, प्रफुल आंबोरकर, नुपेश नादनकर, भैयाजी मुदमवार, दत्तात्रय खरवडे, गुलाबराव मडावी, सुरेश भांडेकर, संजय मेश्राम, प्रभाकर कुबडे, जावेद खान, सर्वेश पोपट आदी पदाधिकारी उपस्थित होते.