आरमोरी : परंपरागत मासेमारीच्या व्यवसायात गुंतलेला ढिवर-भोई समाज मोठ्या संख्येने असूनही शिक्षणाचा अभाव असल्याने संघटीत नाही. त्यामुळे ढिवर समाजाने एकत्र येवून प्रगतीच्या मुद्यांवर संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील मौजा शिवणी (बु.) येथील जय वाल्मिकी ॠषी ढिवर समाज मंडळाच्या वतीने मुर्ती प्रतिष्ठापना व जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भाई जराते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्याच्या सामाजिक परिस्थितीनुसार समाज उन्नतीसाठी आवश्यक मुद्यांना घेवून संघर्ष केला तरच ढिवर-भोई समाजाच्या अडचणी दूर होवून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय अस्तित्व निर्माण करणे शक्य आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन पुरुषोत्तम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.दुर्वेश भोयर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. सहउद्घाटक म्हणून जिल्हा मच्छीमार संघाचे सभापती कृष्णाजी मंचर्लावार, तर प्रमुख अतिथी म्हणून मोहन मदने, सुनील बावणे, डंबाजी भोयर, किशोर बावणे, मिनाक्षी गेडाम, रोहिदास कुमरे, देवेंद्र भोयर, फुलचंद वाघाडे, काॅ. अमोल मारकवार, केशव बारापात्रे, शिवणीचे सरपंच पुरुषोत्तम दोनाडकर, सदस्य गौरी बुल्ले, प्रभा राऊत, पोलीस पाटील शकुंतला पत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजातील युवकांना संधी देवून ढिवर-भोई समाजाची प्रभावी संघटना बांधणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा मच्छीमार संघाचे सभापती कृष्णाजी मंचर्लावार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी इतरही पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान समाज संघटनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भाग्यवान मेश्राम आणि जिल्हा सचिव किशोर बावणे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन भाग्यवान मेश्राम यांनी तर प्रास्ताविक बळीराम दर्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते लोमेश दुमाने, सदाशिव मेश्राम, प्रभुजी मेश्राम, जयेंद्र कांबळे, शामराव मेश्राम, सचिन ठाकरे, राजेंद्र कोल्हे, हरी मेश्राम, राजू पत्रे, प्रकाश मेश्राम, रमेश ठाकरे, सुनील कोल्हे, रवींद्र मेश्राम, रवि कोल्हे, लक्ष्मण भोयर, घनश्याम भोयर, तुकडोजी कोल्हे, केवळजी मेश्राम, मुरलीधर मेश्राम, सुधीर ठाकरे, मनोज मेश्राम यांनी परिश्रम घेतले.