गुरवळ्यात रंगणार डे-नाईट कबड्डी सामने, माऊली क्रीडा मंडळाचे आयोजन

तनुश्री आत्राम यांनी केले उद्घाटन

गडचिरोली : माऊली क्रीडा मंडळ गुरवळा (राखी) यांच्यातर्फे गुरूवार (दि.५) पासून डे -नाईट कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांचे उद्घाटन सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सहउद्घाटक म्हणून सरपंच जया मंटकवार, उपसरपंच प्रकाश बांबोळे, मयुर मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी तनुश्रीताई यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाने विजेत्या संघाला त्यांच्याकडून बक्षीस जाहीर करण्यात आले.