भीमज्योती बहुद्देशिय मंडळ पोटेगांवच्या वतीने डॅा.बाबासाहेबांना आदरांजली

पंचशिल ध्वजारोहण करत अभिवादन

गडचिरोली : पोटेगाव येथील भीमज्योती बहुउद्देशिय मंडळाच्या वतीने रविवारी (दि.14) भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचशिल ध्वज फडकवत बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भाऊसाहेब रामटेके, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डी.एन. मुजमकार होते. यावेळी दिवाकर फुलझेले, लोभेश खुकृळकर, सिद्धार्थ गोवर्धन, आदित्य रंगारी, देवाजी बाबोडे, जगदीश गेजम, शिक्षक फुलझेले, लेनिन खुकृळकर, पंकज रामटेके, भय्याजी वाडगुरे, सुनील तिग्गा, कल्पना फुलझेले, ललिता खुकृळकर, प्रतिभा मेश्राम, संगिता मुंजमकर, इंदिरा खुकृळकर, कुसूम बांबोळे, समिक्षा गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महामानवांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहण डॉ. रामटेके यांच्या हस्ते पार पडले. सामुहिक बुद्ध पुजापाठ करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानेश्वर मुंजमकार यांनीही मनोगत व्यक्त केले. बुद्धीने सर्व माणसे विचारिक होतात. जो विचार व मंथन करतो, चिंतन करतो त्या व्यक्तीच्या बुद्ध्यांकात सतत वाढ होत असते. ज्यांची बौध्दिक प्रगती होते, ती व्यक्ती यशाच्या शिखरावर जाऊन उंच भरारी घेतो. स्वाभिमानी हिरे ज्या समाजात जन्म घेतात ते राष्ट्रसुद्धा महान बनते, असे विचार मुंजमकार यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन पंकज रामटेके यांनी तर आभार डॉ.रामटेके यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.