बी-फॅशन प्लाझासारखा फॅशन मॅाल गडचिरोलीकरांसाठी अभिमानास्पद

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या मागास म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात बी-फॅशन प्लाझाच्या रूपात तयार झालेला मोठा फॅशन मॅाल या जिल्ह्याची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाल्याचे द्योतक आहे. सर्वांच्या आवडीनिवडी जपत बी-फॅशन प्लाझाने आपल्या प्रतिष्ठानाला दिलेले हे नवे रूप गडचिरोलीकरांसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी या मॅालला सदिच्छा भेट दिली.

मॅालच्या उद्घाटनप्रसंगी मी येऊ शकलो नाही. त्यामुळे आता भेट देण्यासाठी आलो असल्याचे सांगत त्यांनी मॅालची पाहणी केली. यावेळी बी-फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले, शैलेश देवलुके आणि हिमांशू देवकुले यांनी त्यांचे स्वागत करून शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, व्यापारी असोसिएशनचे सचिव गुरूदेव हरडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिनेश चिटनुरवार, डॅा.अमित साळवे, कुणाल पेंदोरकर, शिव वडेट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.