म.रा.नवनिर्मित नर्सेस संघटनेने केले सीईओ आयुषी सिंग यांचे स्वागत

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेला नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांची म.रा.नवनिर्मित नर्सेस संघटनेने भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील नर्सेसच्या अडचणींवर त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या अध्यक्ष विमल अंबाडकर, सचिव मिनल वाळके, उपाध्यक्ष ममता गेडाम, कार्याध्यक्ष लिहीतकर, कोषाध्यक्ष भारती गोजे, सल्लागार सलामे, परवीन शेख, तसेच आरती खडसे, धनश्री गेडाम, व्ही.झेड. तुलावी, स्मिता लोणारे, सुनिता खैरे, शोभा गेडाम, पुषा राऊत, वंदना सुपाडे, सुलोचना मरस्कोल्हे, विद्या उईके, ताई बायस्कर, इंदिरा सेलोकर, सारिका गेडाम आदी सदस्यगण उपस्थित होत्या.