गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था बँको ब्लू रिबन पुरस्काराने सन्मानित

सलग दुसऱ्या वर्षी झाला गौरव

गडचिरोली : दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गडचिरोली या संस्थेला सलग दुसऱ्यांदा २०२३ च्या बँको पतसंस्था ब्लू रिबन पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने पुन्हा एकदा संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात संस्थेला यश मिळाले आहे. सदर पुरस्कार दमण (दमण व दीव) येथे सहकारी पतसंस्थांसाठी आयोजित बँको अॅडव्हॉन्टेज सहकार परिषद २०२४ मध्ये राज्याचे माजी सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी व बँकोचे संचालक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या सहकारी पतसंस्थांना त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतुने दरवर्षी उत्कृष्ट पतसंस्थाना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातील विविध सहकारी पतसंस्थाकडून ठरविलेल्या मापदंडानुसार प्रस्ताव मागितले जाते. १०० कोटीच्या वर ठेवी असलेल्या प्रवर्गातून संस्थेने दिलेल्या प्रस्तावाचे परिक्षण करुन तज्ज्ञ परिक्षण समितीने दिलेल्या अहवालानुसार संस्थेला बँको पतसंस्था ब्ल्यु रीबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अनिल पा.म्हशाखेत्री, संचालक दिलीप उरकुडे, शेषराव येलेकर, दिलीप खेवले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.