गडचिरोली पोलिस दलाला मिळाली पेट्रोलिंगसाठी ७४ नवीन वाहने

उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान आणि चार्ली पेट्रोलिंगकरीता गडचिरोली पोलिस दलाला 20 चारचाकी आणि 54 दुचाकी पेट्रोलिंग वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारी यंत्रणा अद्ययावत आणि गतिमान राहण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पोलीस दलाच्या ताफ्यात आता नवीन अद्ययावत वाहने सहभागी झाली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाचे मी अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

गडचिरोलीत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या 364 निवासस्थानांच्या बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी गृहमंत्री फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यतिश देशमुख (अभियान), एस.रमेश (अहेरी) आदी उपस्थित होते.