उपमुख्यमंत्र्यांनी खासदारांच्या घरी घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद

भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी साधना संवाद

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.

खा.नेते यांनी पुष्पहाराने फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि कार्यकर्त्यांनी प्रभू श्री. रामाच्या आतिशबाजी करत त्यांचे जलोषात स्वागत केले. यावेळी आ.डॉ. देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, रविंद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, रेखा डोळस, डॉ.श्रीमती शर्मा, सदानंद कुथे, योगिता पिपरे, गीता हिंगे, अनिल तिडके, प्रणय खुणे, भारत खटी, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस शनिवारी गडचिरोलीत मुक्कामी होते. रविवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून ते नागपूरला रवाना झाले. फडणवीसांची ही गृहभेट आणि पदाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेमुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.