जिल्हा परिषदेअंतर्गत रिक्त असलेल्या गट–क आणि ड पदांची भरती होणार

अनुकंपाधारकांना संधी, यादी प्रकाशित

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत गट–क आणि गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकांमधून भरली जाणार आहेत. त्याअनुषंगाने सन 2023 मध्ये प्राप्त अनुकंपा प्रकरणांची तपासणी करून पूर्ण व अपूर्ण प्रकरणांची माहिती असलेल्या एकूण 464 उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे.

ही यादी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सूचना फलकावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. अनुकंपाधारकांनी सदर तात्पुरत्या जेष्ठता सुचीचे अवलोकन करावे आणि काही आक्षेप, हरकती असल्यास तसे दस्तावेज पुराव्यासह 30 दिवसांच्या आत सादर करावे. मुदतीत आक्षेप न आल्यास जेष्ठता यादी अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी कळविले.