गडचिरोली : यहोवा यिरे फाऊंडेशन आणि कला जीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार संधी मेळावा आणि महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन येत्या 30 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत करण्यात आले आहे. यात बँकिंग क्षेत्रासह इतर क्षेत्रातील काही कंपन्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
यासोबत शिल्पा शाहीर यांची लावणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. बँकिंग क्षेत्रासह इतर व्यावसायात कसे यावे याबद्दल या मेळाव्यात शासकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.