ऑलिम्पियाड परीक्षेत मंदार धामोडे याने पटकाविले दोन सुवर्णपदक

गणित आणि सामान्य ज्ञानात अव्वल

गडचिरोली : सायन्स ऑलिंम्पियाड फाउंडेशनतर्फे पार पडलेल्या ऑलिंम्पियाड परीक्षेत येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचा विद्यार्थी मंदार अनिल धामोडे याने दोन सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले.
सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे एसओएफ इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड, नॅशनल सायबर ऑलिम्पियाड, एसओएफ इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड या परीक्षांचे आयोजन करण्यात येते.

प्रथम स्तरावरील परीक्षेमध्ये मंदार याने एसओएफ इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंम्पियाड व इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिंम्पियाड या दोन्ही परीक्षेत सुवर्णपदकासह यश मिळवले. मंदारच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने नुकतीच चंद्रपूर येथे पार पडलेली द्वितीय स्तरावरची परीक्षा देखील दिली आहे.